शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदतीसाठी ₹२,५४० कोटींचा निधी मंजूर; पहा तुमच्या जिल्ह्याला किती मदत?ativrushti nuksan bharpai

ativrushti nuksan bharpai : नैसर्गिक आपत्ती आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी एकूण २,५४० कोटी ९० लाख ७९ हजार रुपयांच्या भरीव मदत निधीला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

या निधीमुळे नुकसानीची भरपाई तातडीने मिळून शेतकऱ्यांसाठी आगामी रब्बी हंगामाची तयारी करणे सुलभ होणार आहे. मदत व पुनर्वसन मंत्री श्री. मकरंद जाधव-पाटील यांनी ही माहिती दिली.

हे पण वाचा:
PM Kisan 22nd Installment Update पीम किसान २२ वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार?PM Kisan 22nd Installment Update

ativrushti nuksan bharpai प्रति हेक्टरी ₹१० हजार विशेष मदत

राज्य शासनाने केवळ नुकसानीची भरपाई नव्हे, तर रब्बी हंगामासाठी बियाणे आणि शेतीसंबंधित खर्चासाठी विशेष पॅकेज जाहीर केले आहे.

  • या पॅकेज अंतर्गत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १० हजार रुपये (कमाल तीन हेक्टरपर्यंत) अशी आर्थिक मदत दिली जाणार आहे.
  • या विशेष मदतीसाठी १,७६५ कोटी २२ लाख ९२ हजार रुपये निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे.
  • राज्य शासनाने अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्राचा आढावा घेतल्यानंतर, वाढीव एक हेक्टर मर्यादेत मदत देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

जिल्हानिहाय निधी वितरण (निवडक जिल्ह्यांसाठी)

शेतकऱ्यांपर्यंत ही मदत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी जिल्हानिहाय निधी वितरणाचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर: या पाच जिल्ह्यांतील सुमारे १६.५९ लाख शेतकऱ्यांच्या १२.११ लाख हेक्टर क्षेत्रातील नुकसानीसाठी १,२११ कोटी ५४ लाख ९० हजार रुपये निधी मंजूर.
  • अमरावती जिल्हा: येथील ४.९० लाख हून अधिक शेतकऱ्यांच्या ५.४७ लाख हेक्टर क्षेत्रातील नुकसान भरपाई म्हणून ५४७ कोटी ८७ लाख ६६ हजार रुपये वितरित करण्यास मान्यता.
  • सातारा जिल्हा: येथील १४,६४३ शेतकऱ्यांच्या ५,८०३.५५ हेक्टर क्षेत्रातील नुकसानीसाठी ५ कोटी ८० लाख ३६ हजार रुपये वितरित केले जाणार आहेत.

विभागनिहाय मदत वितरण

जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी व पूरामुळे नुकसान झालेल्या नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या विभागांतील शेतकऱ्यांना एकूण १२० कोटी ३३ लाख ८७ हजार रुपयांची अतिरिक्त मदत देण्यात येणार आहे.

हे पण वाचा:
Weather Update 2026 या जिल्ह्यांत तापमानाचा पारा खाली जाणार; थंडीचा कडाका वाढणार!Weather Update 2026

याशिवाय, खालील जिल्ह्यांसाठी निधी वितरणाला मान्यता मिळाली आहे

  • धाराशिव जिल्हा: ६३,४१४ शेतकऱ्यांसाठी ४२ कोटी ४५ लाख ९३ हजार रुपये.
  • वर्धा जिल्हा: २१,३९२ शेतकऱ्यांच्या १५,५१२.११ हेक्टरवरील बाधित क्षेत्रासाठी १३ कोटी २० लाख ३८ हजार रुपये मंजूर.
  • अमरावती, बुलढाणा, वाशिम, अकोला आणि यवतमाळ: या जिल्ह्यांतील ८६,५८२ शेतकऱ्यांच्या ७१,३३३.९० हेक्टरवरील नुकसानीसाठी ६१ कोटी ८१ लाख ६४ हजार रुपये वितरित होणार.

शेतकऱ्यांनी या मदत निधीचा वापर रब्बी हंगामासाठी नियोजनबद्ध पद्धतीने करून शेती पूर्ववत करावी, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment