महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेतील ही अट आता रद्द…Mahadbt Farmer Scheme

Mahadbt Farmer Scheme : राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या ‘राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजने’त (Mahadbt Farmer Scheme) एक अत्यंत महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा बदल करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे.

Mahadbt Farmer Scheme काय होता पूर्वीचा नियम?

या योजनेत ट्रॅक्टर वगळता इतर शेती अवजारांसाठी अनुदान घेताना, लाभार्थ्याला एका आर्थिक वर्षात केवळ तीन औजारे किंवा जास्तीत जास्त रुपये एक लाख रकमेत जेवढी औजारे घेता येतील, तेवढ्याच औजारांसाठी अनुदान मिळत होते. तसेच, ज्या औजारासाठी अनुदानाची रक्कम एक लाखापेक्षा जास्त असेल, त्यासाठी एका वर्षात फक्त एकाच औजारासाठी अनुदान दिले जात असे. या मर्यादेमुळे अनेक गरजू शेतकरी एकाच वर्षात त्यांना आवश्यक असलेल्या सर्व औजारांचा लाभ घेऊ शकत नव्हते.

१ लाख अनुदानाची मर्यादा रद्द

शेतकऱ्यांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीचा विचार करून, कृषी विभागाने ७ ऑक्टोबर २०२५ रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत ही अडचण दूर केली आहे. नवीन शासन निर्णयानुसार, सदर एक लाख रुपये अनुदानाची मर्यादा आता पूर्णपणे काढण्यात आली आहे.

हे पण वाचा:
PM Kisan 22nd Installment Update पीम किसान २२ वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार?PM Kisan 22nd Installment Update

या बदलामुळे, आता एका वर्षात लाभार्थ्याची ज्या ज्या घटकासाठी (उदा. नांगर, रोटावेटर, पेरणी यंत्र इ.) निवड झाली आहे, त्या सर्व घटकासाठी अनुदान मिळणार आहे. याचा अर्थ, शेतकऱ्याला आता हवे असलेले कोणतेही कृषी अवजार घेता येणार आहे आणि त्यासाठी अनुदानाची रकमेची मर्यादा अडथळा ठरणार नाही. मात्र, एकाच अवजारासाठी (उदा. फक्त एकाच रोटावेटरसाठी) अनुदानाचा लाभ पुन्हा मिळणार नाही, याची दक्षता शेतकऱ्याला घ्यावी लागेल.

ट्रॅक्टर अनुदानात कोणताही बदल नाही

या योजनेत ट्रॅक्टर खरेदीसाठीच्या अनुदानाच्या रकमेत कोणताही बदल झालेला नाही. ट्रॅक्टरसाठी अनुसूचित जाती/जमाती, अल्प-मध्यम भूधारक आणि महिला लाभार्थींना पूर्वीप्रमाणेच सव्वा लाख रुपये (₹१.२५ लाख) आणि इतर भूधारक लाभार्थ्यांसाठी एक लाख रुपये (₹१ लाख) एवढे अनुदान कायम आहे.

हा महत्त्वपूर्ण बदल महाडीबीटी पोर्टलवर नव्याने लॉटरीमध्ये पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. आता शेतकरी आवश्यक असलेल्या अनेक कृषी अवजारांसाठी मोठ्या प्रमाणात लाभ घेऊ शकतील. ही योजना पूर्वीप्रमाणेच ५ जून २०२५ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबवली जाईल.

हे पण वाचा:
Weather Update 2026 या जिल्ह्यांत तापमानाचा पारा खाली जाणार; थंडीचा कडाका वाढणार!Weather Update 2026

शेतकऱ्यांना आवाहन

या मोठ्या बदलामुळे शेतीचे यांत्रिकीकरण जलदगतीने होण्यास मदत मिळणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करून या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Leave a Comment