राज्यात या तारखेपर्यंत पावसाचा मुक्काम; या तारखेनंतर थंडीचा जोर वाढणार!Punjab dakh havaman andaj

Punjab dakh havaman andaj : हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात २५ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर या चार दिवसांच्या कालावधीत विविध भागांमध्ये जोरदार आणि विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस संपूर्ण राज्यात एकाच वेळी नसेल, परंतु तो भाग बदलत पडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, या चार दिवसांत पडणारा पाऊस हा या मान्सून (पावसाळ्यातील) हंगामातील शेवटचा पाऊस असेल, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

Punjab dakh havaman andaj या चार विभागांत पावसाचा जोर अधिक

हा पाऊस प्रामुख्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी आणि उत्तर महाराष्ट्र या चार विभागांमध्ये जास्त प्रमाणात असण्याची शक्यता आहे. नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, धाराशिव (उस्मानाबाद), बीड, जालना, संभाजीनगर (औरंगाबाद), अहिल्यानगर (अहमदनगर), सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यांमध्ये आणि संपूर्ण कोकणपट्टीत आज (२५ ऑक्टोबर) रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे पण वाचा:
PM Kisan 22nd Installment Update पीम किसान २२ वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार?PM Kisan 22nd Installment Update

या तुलनेत पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये पाऊस असला तरी त्याचे प्रमाण कमी असेल आणि तो केवळ भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपात पडेल, असे डख यांनी सांगितले आहे.

२९ ऑक्टोबरपासून हवामान कोरडे, थंडीची चाहूल

शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे २८ ऑक्टोबरनंतर राज्यात हवामान कोरडे होण्यास सुरुवात होणार आहे. २९ ऑक्टोबरपासून राज्यात सूर्यदर्शन होईल आणि पाऊस पूर्णपणे थांबेल, असा अंदाज आहे.

या बदलानंतर राज्यात थंडीला सुरुवात होईल. २ नोव्हेंबरपासून राज्यात थंडीचा जोर वाढेल. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना कांद्याचे रोप लावायचे आहे किंवा पेरणी करायची आहे, त्यांच्यासाठी २९ ऑक्टोबरनंतरचे वातावरण अनुकूल असेल. तसेच, २९, ३०, ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर या काळात राज्यात धुई, धुके आणि धुराळे देखील पाहायला मिळेल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

हे पण वाचा:
Weather Update 2026 या जिल्ह्यांत तापमानाचा पारा खाली जाणार; थंडीचा कडाका वाढणार!Weather Update 2026

वातावरणात अचानक कोणताही बदल झाल्यास त्याबद्दल त्वरित माहिती दिली जाईल, असेही हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी सांगितले आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी या अंदाजानुसार योग्य ती खबरदारी घ्यावी.

Leave a Comment