महागाईमुळे ‘लक्ष्मी’ महागली! केरसुणीच्या दरात यंदा १० ते १५ टक्क्यांची वाढ Kersuni Price

Kersuni Price : दिवाळीच्या तोंडावर महागाईचा फटका आता साफसफाईसाठी वापरल्या जाणाऱ्या आणि धनपूजनासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या केरसुणीलाही (झाडू) बसला आहे. यंदा केरसुणीच्या दरात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली असून, ग्राहकांना ‘लक्ष्मी’ अधिक किंमत मोजून घरी आणावी लागत आहे.

वाल्हे (तालुका पुरंदर) येथील मंगळवारच्या आठवडे बाजारात दिवाळीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. दिवाळीतील धनपूजन आणि लक्ष्मी (केरसुणी) पूजनाच्या परंपरेमुळे बाजारात विविध प्रकारची केरसुणी आणि ‘लक्ष्मी पाऊले’ विक्रीसाठी दाखल झाली होती.

केरसुणीचे वाढलेले दर Kersuni Price

विक्रेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंदा महागाईमुळे केरसुणीच्या किमती वाढल्या आहेत.

हे पण वाचा:
shetkari karjmafi varas मृत शेतकऱ्यांच्या वारसांनाही आता कर्जमाफीचा लाभ मिळणार; आधार प्रमाणीकरणात सरकारचा महत्त्वाचा निर्णय shetkari karjmafi varas
  • मोठी केरसुणी: सध्या ८० रुपये दराने विकली जात आहे.
  • छोटी केरसुणी: ६० रुपये दराने उपलब्ध आहे.
  • देवघरासाठीची केरसुणी: याची किंमत २० रुपये असल्याचे विक्रेते संतोष सपकाळ यांनी सांगितले.

पारंपरिक प्रथेनुसार, दिवाळीच्या निमित्ताने नवीन केरसुणी विकत घेऊन तिची पूजा करण्याची पद्धत आजही अनेक घरांमध्ये पाळली जाते. त्यामुळे नागरिक आवर्जून केरसुणी खरेदी करत आहेत.

व्यावसायिकांमध्ये नाराजी

दिवाळी सण अगदी जवळ आल्यामुळे बाजारात केरसुणीची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत आवक जास्त झाल्याने मंगळवारच्या आठवडे बाजारात अनेक व्यावसायिकांना केरसुणीला योग्य किंमत मिळाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. काही व्यावसायिकांना एका केरसुणीसाठी ७० ते ८० रुपयांपर्यंत दर मिळाला.

कच्च्या मालाचा तुटवडा हे मुख्य कारण

केरसुणीच्या दरवाढीमागे कच्च्या मालाचा तुटवडा हे प्रमुख कारण आहे. केरसुणी बनवण्यासाठी शिंदीच्या झाडांच्या फांदीचा वापर केला जातो. व्यावसायिक संतोष सपकाळ यांनी सांगितले की, ग्रामीण भागातून शिंदीच्या झाडांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे केरसुणी बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरेसा उपलब्ध होत नाही. परिणामी, आता रेडिमेड केरसुणी विक्रीसाठी आणावी लागत आहे, ज्यामुळे उत्पादन खर्चात आणि पर्यायाने विक्री दरात वाढ झाली आहे.

हे पण वाचा:
Shetkari Karjmafi Farmer ID कर्जमाफी KYC, फार्मर आयडीची अडचण? शासनाचा मोठा निर्णय!आता लाखो शेतकऱ्यांना दिलासा  Shetkari Karjmafi Farmer ID

या आधुनिक काळातही नागरिक केरसुणी खरेदीला विशेष पसंती देत आहेत. शिंदीच्या झाडापासून तयार केलेल्या केरसुणीला दिवाळीतील पूजनासाठी आजही धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे स्थान असल्याचे नागरिक सचिन देशपांडे यांनी सांगितले.

Leave a Comment