अतिवृष्टी अनुदान गावानुसार vk नंबर याद्या जाहीर! येथे पहा यादी. vk number list

vk number list राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. शेती पिकांचे मोठे नुकसान झाले, ज्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला. अशा कठीण परिस्थितीत, राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी घोषणा केली आहे. १३ जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांसाठी तब्बल १३५६ कोटी रुपयांच्या अतिरिक्त मदतनिधीला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही रक्कम थेट दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याने सणासुदीसाठी मोठा आधार मिळणार आहे.

मदतनिधीत भरीव वाढ: आतापर्यंतचा सर्वात मोठा आधार vk number list

शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता, शासनाने यापूर्वीही भरपाई जाहीर केली होती. सुरुवातीला २२१५ कोटी, त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी ४९० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते. आता या मदतीच्या मालिकेत भर घालत, नवीन शासन निर्णय (GR) जारी करून १३ जिल्ह्यांसाठी १३५६ कोटी रुपयांचा हा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, त्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.

हे पण वाचा:
ladki bahin लाडकी बहीण योजना; रक्षाबंधनानिमित्त १५०० की ३००० रुपये येणार? GR आला ladki bahin

नुकसान भरपाईचे सुधारित दर आणि मर्यादा:

शासनाच्या या निर्णयानुसार, नुकसान भरपाईची मदत प्रति शेतकरी दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाईल. मात्र, नुकसानीच्या स्वरूपानुसार मदत दरांमध्ये भरीव वाढ करण्यात आली आहे. सुधारित दर खालीलप्रमाणे आहेत:

पिकाचा प्रकारप्रति हेक्टर मदत (रुपये)
जिरायती पिके (धान्य, कडधान्य)१८,५०० रुपये
पारंपरिक बागायती जमिनीसाठी (उदा. कांदा, ऊस, केळी)२७,००० रुपये
फळबाग लागवड (नवीन लागवड)३२,५०० रुपये

या १३ जिल्ह्यांना मिळणार तत्काळ मदत:

vk number list नव्याने मंजूर झालेला हा १३५६ कोटी रुपयांचा मोठा निधी खालील १३ जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांसाठी तातडीने वितरित केला जाणार आहे. काही जिल्ह्यांना यापूर्वीच मदत मिळाली असली तरी, त्यांना आता ही अतिरिक्त रक्कम मिळणार आहे.

जिल्हाबाधित शेतकरी संख्यामंजूर निधी (कोटी रुपये)
बुलढाणा४,४९,००८२८९.२७
बीड८,००,५१३५७७.७८
हिंगोली१०,५१,०२०५५३.७२
धाराशिव४,०४,६५६२९२.४९
लातूर४,१५,४९२२०२.३८
परभणी४,३९,०९७२४५.६४
अकोला१,२०,४६६९१.१२
वाशिम४०,५४५३४.६४
नांदेड८३,२६०२८.५२
सातारा११,११३६.२९
कोल्हापूर५,८६०३.१८
जालना१,८२७ (अतिरिक्त)०.८३ (अतिरिक्त)

वाटप प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू:

बुलढाणा, अकोला, वाशिम आणि हिंगोली यांसारख्या जिल्ह्यांमध्ये यापूर्वीच्या आदेशानुसार निधी वाटप सुरू झाले असून, काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे. आता या नवीन शासन निर्णयामुळे १३ जिल्ह्यांतील लाभार्थी याद्या अंतिम झाल्या आहेत. दिवाळीपूर्वी तातडीने निधीचे वितरण पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. परभणीसारख्या अनेक जिल्ह्यांना दोन वेगवेगळ्या शासन निर्णयांतर्गत ‘दुहेरी’ मदत मिळणार असल्याने, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा ठरला आहे.

हे पण वाचा:
shetkari karjmafi varas मृत शेतकऱ्यांच्या वारसांनाही आता कर्जमाफीचा लाभ मिळणार; आधार प्रमाणीकरणात सरकारचा महत्त्वाचा निर्णय shetkari karjmafi varas

VK नंबरद्वारे तात्काळ अनुदानाचे वितरण:

शेतकऱ्यांच्या मदतीमध्ये कोणताही विलंब होऊ नये यासाठी, शासनाने ‘vk नंबर’ आधारित याद्या गावानुसार प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. महसूल अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे या याद्या तयार करून त्या तलाठी यांच्याकडे सुपूर्द केल्या जात आहेत. या याद्यांच्या माध्यमातून मदत थेट आणि तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.

vk नंबर गावानुसार याद्या जाहीर

राज्य शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. याच अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यातील गावानुसार याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत. आपल्या गावाची यादी पाहण्यासाठी व मिळवण्यासाठी आपल्या तलाठी कार्यालया सोबत संपर्क साधून यादी मिळवू शकता. यादी मधील फक्त शेतकरी ओळखपत्र नसणाऱ्या शेतकाऱ्यांनाच kyc करावी लागणार आहे. बाकी शेतकऱ्यांना kyc करण्याची गरज नसल्याचे देखील कृषि विभागाने जाहीर केले आहे.

हे पण वाचा:
Shetkari Karjmafi Farmer ID कर्जमाफी KYC, फार्मर आयडीची अडचण? शासनाचा मोठा निर्णय!आता लाखो शेतकऱ्यांना दिलासा  Shetkari Karjmafi Farmer ID

Leave a Comment