बांधकाम कामगारांच्या मुलांना १,००,००० शिष्यवृत्ती. अर्ज सुरू! bandhkam kamgar scholarship

bandhkam kamgar scholarship महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ (Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board) हे राज्यातील लाखो बांधकाम कामगार कुटुंबांसाठी आधारस्तंभ आहे. कामगारांच्या कल्याणासाठी राबवल्या जाणाऱ्या अनेक महत्त्वाच्या योजनांपैकी, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना ही मुलांच्या उज्वल भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.

मंडळातर्फे ही शिष्यवृत्ती बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत पुरवते. तुम्ही २०२५ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज करत असाल, तर मंडळाने फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेत केलेले महत्त्वपूर्ण बदल समजून घेणे गरजेचे आहे.

हे पण वाचा:
ladki vidyarthini yajana लाडकी बहीणनंतर आता लाडकी विद्यार्थिनी योजना! मुलींना वर्षाला ₹6000; कोणाला मिळणार लाभ? ladki vidyarthini yajana

शिष्यवृत्तीची मुख्य उद्दिष्ट्ये आणि पात्रता bandhkam kamgar scholarship

बांधकाम कामगार कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या पालकांवरील आर्थिक ताण कमी व्हावा, हा या योजनेचा मूक्ष्म उद्देश आहे.

  • पात्रता: ही शिष्यवृत्ती पहिली (इयत्ता १ ली) ते पदवीपर्यंत (Graduation) शिक्षण घेत असलेल्या कामगारांच्या पाल्यांसाठी उपलब्ध आहे.

२०२५ साठी अर्ज करण्याची नवीन नियमावली

मागील वर्षांपर्यंत फॉर्म ऑनलाईन भरण्याची सोय होती, पण आता मंडळाने ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी नवा नियम लागू केला आहे:

अर्ज करण्याची अनिवार्य पद्धत: तालुका सुविधा केंद्र

  • नियम: आता बांधकाम कामगार शिष्यवृत्तीचा अर्ज थेट मंडळाच्या वेबसाईटवर भरता येत नाही. अर्ज करण्यासाठी कामगारांना त्यांच्या जवळच्या तालुका सुविधा केंद्रामध्ये (Taluka Suvidha Kendra) प्रत्यक्ष जाणे अनिवार्य आहे.
  • केंद्र शोधा: महाराष्ट्रात ३५० हून अधिक तालुका सुविधा केंद्रे उपलब्ध आहेत. ही केंद्रे कुठे आहेत, याची माहिती मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरील ‘संपर्क’ (Contact) विभागात पाहता येते. अर्ज करण्यापूर्वी तुमच्या तालुक्यातील केंद्राचा पत्ता निश्चित करा.

महत्त्वाची सूचना: मूळ कागदपत्रे (Originals) आवश्यक

  • फॉर्म भरण्यासाठी जाताना सर्व आवश्यक कागदपत्रे मूळ (Original) स्वरूपात सोबत ठेवा. अनेक ठिकाणी केवळ झेरॉक्स (Photocopies) स्वीकारल्या जात नाहीत.

फॉर्म भरण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

तालुका सुविधा केंद्रात जाण्यापूर्वी ही यादी तपासा आणि सर्व डॉक्युमेंट्स तयार ठेवा

हे पण वाचा:
Ladki bahin yojana hafta update लाडकी बहीण योजना आज GR येणार मोठी शक्यता एकत्रित ३००० रुपये मिळणार? Ladki bahin yojana hafta update
आवश्यक कागदपत्रेतपशील
नोंदणी/नूतनीकरण पावतीबांधकाम कामगार म्हणून केलेली वैध नोंदणी किंवा नोंदणी नूतनीकरण (Renew) केलेली एक रुपयाची पावती.
बोनाफाईट प्रमाणपत्रपाल्याने सध्या शिक्षण घेत असलेल्या शाळेचे/कॉलेजचे बोनाफाईट सर्टिफिकेट.
उपस्थितीचा दाखलाअर्ज करत असलेल्या शैक्षणिक वर्षातील पाल्याच्या उपस्थितीचा दाखला (Attendance Certificate).
ओळखपत्रपाल्याचे आधार कार्ड.
इतररेशन कार्ड आणि आवश्यकतेनुसार लागणारी इतर मूळ कागदपत्रे.

तालुका सुविधा केंद्रातील प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया

केंद्रात पोहोचल्यावर फॉर्म भरण्याची प्रक्रिया खालील टप्प्यांमध्ये पूर्ण होते:

कागदपत्रे तपासणी:

  • केंद्रातील अधिकाऱ्यांकडून तुमच्या सर्व मूळ कागदपत्रांची तपासणी करून घ्या. कागदपत्रे व्यवस्थित आहेत की नाही, याची खात्री करा.

टोकन आणि ऑपरेटरकडे सबमिशन:

हे पण वाचा:
Diwali anudan 2026 शेतकऱ्यांना दिवाळी अनुदान 5000 सोबत नमो शेतकरी 4000 रुपये सरकार निर्णय घेणार? Diwali anudan 2026
  • कागदपत्रे बरोबर आढळल्यास तुम्हाला एक टोकन नंबर दिला जाईल.
  • टोकन घेऊन ऑपरेटरकडे तुमचा अर्ज जमा करा.

OTP (One Time Password) प्रक्रिया:

  • फॉर्म सबमिट होत असताना, तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP (वन टाईम पासवर्ड) पाठवला जातो. हा OTP ऑपरेटरला सांगितल्याशिवाय फॉर्म पुढे जात नाही.
  • अत्यंत महत्त्वाचे: तुमचा मोबाईल नंबर नेहमी चालू आणि मंडळाकडे अपडेटेड असणे बंधनकारक आहे, अन्यथा अर्ज प्रक्रिया पूर्ण होणार नाही.

बायोमेट्रिक प्रक्रिया:

  • फॉर्म भरल्यानंतर, बांधकाम कामगाराचा (अर्जदाराचा) एक तात्काळ फोटो (Capture) घेतला जातो.
  • त्यानंतर ओळख पटविण्यासाठी अंगठ्याचा ठसा (Thumb Impression) घेतला जातो.

अर्ज सबमिशन: ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, तुमचा शिष्यवृत्ती योजनेचा फॉर्म यशस्वीरित्या सबमिट होतो.

हे पण वाचा:
namo shetkari hapta दुष्काळ मदतीसोबत नमोच्या दोन हप्त्यांचे 4 हजार रुपये मिळणार का?namo shetkari hapta

तुमच्या अर्जाचा स्टेटस कसा तपासावा?

फॉर्म सबमिट झाल्यावर, साधारणतः एक महिन्याच्या कालावधीत, मंडळाकडून तुम्हाला तुमच्या अर्जाच्या स्थितीबद्दल (मंजूर/नामंजूर) मेसेज (SMS) पाठवला जातो. जर तुम्हाला मेसेज आला नसेल, तर तुम्ही मंडळाच्या प्रोफाईल लॉगिनमध्ये जाऊन तुमच्या ‘क्लेम स्टेटस’ची माहिती तपासू शकता.

Leave a Comment