फळबाग पीक विमा अर्ज सुरू! असा करा अर्ज. falbag crop insurance

falbag crop insurance बदलत्या आणि अनिश्चित हवामानामुळे फळपिकांचे मोठे नुकसान होत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन घटून आर्थिक फटका बसतो. या नुकसानीवर मात करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामान धोक्यांपासून संरक्षण देण्यासाठी कृषी विभागातर्फे पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबवली जात आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, कमी किंवा जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळवून देणे आहे.

हे पण वाचा:
shetkari karjmafi varas मृत शेतकऱ्यांच्या वारसांनाही आता कर्जमाफीचा लाभ मिळणार; आधार प्रमाणीकरणात सरकारचा महत्त्वाचा निर्णय shetkari karjmafi varas

योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक बाबी: falbag crop insurance

योजनेच्या लाभासाठी कृषी विभागाने काही महत्त्वाच्या अटी व नियम निश्चित केले आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे:

  • शेतकरी ओळखपत्र: अ‍ॅग्रीस्टॅक (AgriStack) अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) असणे बंधनकारक आहे.
  • ई-पीक पाहणी: ई-पीक पाहणी (E-Pik Pahani) DCS मोबाईल ॲप्लीकेशन मध्ये आपल्या फळपिकाची अचूक नोंद करणे अनिवार्य आहे.
  • विमा अर्ज: विमा अर्जासोबत फळबागेचा जीओ टॅगिंग (Geo-tagging) केलेला फोटो विमा पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे.
  • क्षेत्र मर्यादा: विमा संरक्षण केवळ उत्पादनक्षम फळबागांना लागू राहील.
    • कोकण विभाग वगळता इतर विभागांसाठी: एका फळ पिकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र १० गुंठे आणि जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा सर्व फळपिके व दोन्ही हंगाम मिळून प्रति शेतकरी ४ हेक्टर (सुमारे १० एकर) इतकी राहील.
    • कोकण विभागाकरिता: एका फळ पिकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र १० गुंठे आणि जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा सर्व फळपिके व दोन्ही हंगाम मिळून प्रति शेतकरी ४ हेक्टर (सुमारे १० एकर) इतकी राहील.

हप्ता भरण्याची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे:

या योजनेत सहभागी होण्यासाठी विमा हप्ता भरणे आवश्यक आहे. नुकतेच यासाठी विमा पोर्टल सुरु झाले आहे.

  • ऑनलाईन हप्ता भरणे: आपण आपला विमा हप्ता आपले सरकार सेवा केंद्र, बँक किंवा भारत सरकारच्या अधिकृत www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरू शकता.
  • बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी: कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव अंतिम मुदतीपूर्वी जमा करताना खालील कागदपत्रे सोबत ठेवावी:
    • पूर्ण भरलेले विमा प्रस्ताव पत्रक
    • फळबागेची नोंद असलेला सातबारा उतारा
    • आधार कार्ड
    • स्वयंघोषणापत्र
    • फळ बागेचा जिओ टॅगिंग केलेला फोटो
    • विमा हप्त्याची रक्कम

हे सर्व कागदपत्रे आणि विमा हप्ता आपण आपल्या खाते असलेल्या बँक शाखेत, वि.का.स. सेवा सोसायटीत अथवा सीएससी (CSC) केंद्रात अंतिम मुदतीपूर्वी जमा करू शकता.

हे पण वाचा:
Shetkari Karjmafi Farmer ID कर्जमाफी KYC, फार्मर आयडीची अडचण? शासनाचा मोठा निर्णय!आता लाखो शेतकऱ्यांना दिलासा  Shetkari Karjmafi Farmer ID

या महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास, आपण आपल्या नजीकच्या सहायक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा.

Leave a Comment