पाऊस कधी विश्रांती घेणार; पंजाब डख यांचा हवामान अंदाज!Wealther Update

Wealther Update : राज्यात सध्या सक्रिय असलेल्या पावसाचा मुक्काम आता लवकरच संपणार आहे. हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांच्या अंदाजानुसार, सध्या सुरू असलेला पाऊस आणखी फक्त तीन दिवस म्हणजे २८, २९ आणि ३० ऑक्टोबरपर्यंतच राज्यात विखुरलेल्या स्वरूपात पडण्याची शक्यता आहे.

डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या दोन चक्रीवादळे सक्रिय असल्यामुळे हा पाऊस पडत आहे. मात्र, निसर्गाने आता एक महत्त्वाचा संकेत दिला आहे. अनेक शेतांमध्ये ‘जाळी धुई’ (कोळ्यांची जाळी आणि दव) पडायला सुरुवात झाली आहे. निसर्गाच्या या संकेतानुसार, ‘जाळी धुई’ दिसल्यानंतर १२ दिवसांनी पाऊस कायमचा निघून जातो, असे पंजाब डख यांचे म्हणणे आहे.

हे पण वाचा:
Panjabrao Dakh Live आज या भागात जोरदार पाऊस! या जिल्ह्यांना रेड अलर्ट हवामान अंदाज Panjabrao Dakh Live

Wealther Update पाऊस कधी थांबणार?

या नैसर्गिक संकेतानुसार, राज्यात १ नोव्हेंबरनंतर पावसाचा जोर ओसरणार आहे आणि २ नोव्हेंबरनंतर पावसाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर कमी होईल.

सध्या पडणारा पाऊस सर्वदूर नसून तो ‘भाग बदलत विकुरलेल्या स्वरूपाचा’ असेल. याचा अर्थ काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, तर काही ठिकाणी रिमझिम होईल, किंवा काही गावे वगळली देखील जातील. २८ ते ३० ऑक्टोबर या काळात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खान्देश, मराठवाडा, तसेच मुंबई, पुणे, नाशिक या भागांमध्ये पावसाचे वातावरण राहील.

हे पण वाचा:
Loan Waiver कर्जमाफीचे पैसे हवे असतील तर आताच करा ‘हे’ काम, तरच मिळेल कर्जमाफी!Loan Waiver

शेतकऱ्यांनी पुढील चार दिवसांत विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता असल्याने स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

२ नोव्हेंबरपासून थंडीची चाहूल

राज्यातून पाऊस पूर्णपणे ओसरताच थंडीची चाहूल सुरू होणार आहे. पंजाब डख यांच्या अंदाजानुसार, २ नोव्हेंबरच्या आसपास उत्तर महाराष्ट्राकडे (नाशिक, निफाड, नंदुरबार, जळगाव) थंडीची सुरुवात होईल. ही थंडी हळूहळू उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकत जाईल. सोलापूर जिल्ह्यासह इतर दक्षिणेकडील भागात ४, ५ किंवा ६ नोव्हेंबरपर्यंत थंडी पसरेल.

थंडीच्या या सुरुवातीच्या काळात २ ते ७ नोव्हेंबरदरम्यान राज्याच्या अनेक भागांत ‘धुई, धुके, धुराळे’ (मिस्ट/धुके) चे वातावरण असेल. हे ढगाळ वातावरण थंडीच्या आगमनाची सूचना देईल. शेतकऱ्यांनी या अंदाजानुसार आपल्या पिकांची कामे आणि नियोजन करावे. हवामानात कोणताही अचानक बदल झाल्यास त्वरित नवा संदेश दिला जाईल, याची नोंद घ्यावी, असे डख यांनी स्पष्ट केले आहे.

हे पण वाचा:
drone didi yojana नमो ड्रोन दीदी योजना; अर्ज कसा करायचा, कोणत्या महिलांना मिळणार लाभ पाहा संपूर्ण माहिती drone didi yojana

Leave a Comment